१) एगलेस बेसिक (व्हॅनिला/चॉकलेट) केक : (व्हिनेगर घालून)

एगलेस चॉकलेट केक – प्रकार १

साहित्यः
१.५ कप ऑल पर्पज फ्लोर (किंवा मैदा), १ कप बारीक साखर,  ३ टेबलस्पून अनस्वीटन्ड कोको पावडर, १ टीस्पून बेकिंग सोडा, १/२ टीस्पून मीठ, १ टीस्पून वॅनिला एक्सट्रॅक्ट (इसेन्स), १ टेबलस्पून व्हाइट व्हिनेगर, ५ टेबलस्पून तेल, १ कप थंड पाणी

कृती:
१. एका बाउलमधे ऑल पर्पज फ्लोर (किंवा मैदा) आणि कोको पावडर पिठाच्या चाळणीने एकत्र चाळून घ्या. (चाळल्यामुळे केक जास्त फ्लपी होतो म्हणतात. मी ही चाळण्याची स्टेप (चाळणी नसल्याने 😦 केली नव्हती.  pre-sifted ऑल पर्पज फ्लोर आणि कोको पावडर नुसतचं मिक्स करून घेतलं होतं.)
२. आता त्यात साखर, बेकिंग सोडा, मीठ घाला. एकत्र मिक्स करून घ्या. मग त्यात वॅनिला एक्सट्रॅक्ट, व्हाइट व्हिनेगर, तेल, पाणी घाला. हे सर्व एकत्र मिक्स करून चांगले आणि भरपूर फेटून घ्या.
३. आता केक पॅन मध्ये १/२ चमचे तेल घालून तेल हाताने पसरून केक पॅन तेलाने चांगला कोट करून घ्या. जास्तीचे तेल काढून टाका. त्यावर थोडे ऑल पर्पज फ्लोर (किंवा मैदा)  हाताने भुरभुरून घ्या.  मग त्यात वरील मिश्रण ओता.
४. ओव्हन ३५० °F ला प्रिहिट करून घ्या. मग त्यात केक पॅन ठेवून ३५ मिनिटे बेक करून घ्या. एक टूथपिक केकमध्ये खूपसून बाहेर काढल्यावर क्लीन बाहेर आली तर केक झाला असं समजा. केक झाला नसेल तर अजून थोडा वेळ ओव्हनमध्ये ठेवा. केक झाल्यानंतर १०/१५ मिनिटं ओव्हन स्विच ऑफ करून ओव्हनचं दार उघड ठेवा. मग केक पॅन बाहेर काढून तो कूलिंग रॅकवर ( नसेल तर डिशमध्ये / कटिंग बोर्डवर) उपडा करा. एगलेस चॉकलेट केक तयार 🙂

टीपः
१) हा केक बेताचा गोड होतो. जास्त नाही. ज्यांना खूप गोड केक आवडतो त्यांनी साखरेचे प्रमाण वाढवावे.
ज्याना खूप चॉकलेटी फ्लेवर आवडत नाही त्यांनी ३ ऐवजी २ टेबलस्पून कोको पावडर वापरावी. आणि चॉकलेट फ्लेवर अजिबात नको असेल तर कोको पावडर घालू नये.
२) १ कप = १ आमटीची चांगली मोठी वाटी.
३) केक बेक करण्याचा वेळ ओव्हन किंवा केक पॅनचा शेप-साइज यावर अवलंबून असतो. त्यानुसार वेळ अ‍ॅडजेस्ट करून घ्या.
४) केकच्या साहित्याचे प्रमाण विकिहाऊ वरून (साभार) घेतले आहे. बर्‍याच साइट्सवर तंतोतंत हेच प्रमाण वापरले आहे. त्यामुळे हेच प्रमाण घ्यायचे ठरवले.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s