२) एगलेस बेसिक (व्हॅनिला/चॉकलेट) केक : (दही घालून)

साहित्यः १.५ कप चाळलेला ऑल पर्पज फ्लोर (किंवा मैदा), १ कप बारीक साखर (पिठी साखर नाही. बारीक साखर), पाऊण कप दही, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, सव्वा टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा कप तेल, १ टीस्पून वॅनिला एक्सट्रॅक्ट (इसेन्स)
(चॉकलेट फ्लेवर हवा असेल तर) अनस्वीटन्ड कोको पावडर

कृती:
१. दही फेटून घ्या. मग त्यात साखर घालून साखर विरघळेपर्यंत फेटा. आता त्यात बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालून फेटा. ३ मिनिटे मिश्रण बाजूला ठेवा. आता मिश्रणातून हवेचे बुडबुडे येताना दिसतील.
२. मग त्यात तेल आणि इसेन्स घालून फेटा. आता त्यात थोडे थोडे ऑल पर्पज फ्लोर (किंवा मैदा) घालून फेटत रहा.
३. हळूहळू सगळे ऑल पर्पज फ्लोर (किंवा मैदा) घालून मिश्रण चांगले फेटून घ्या. (चॉकलेट फ्लेवर हवा असेल तर यामध्ये २ टेबलस्पून कोको पावडर घालून मिश्रण फेटून घ्या.)
४. ओव्हन ३५० °F ला प्रिहिट करून घ्या. केक पॅन बटरने कोट करून घ्या.
५. मग हे मिश्रण केक पॅनमध्ये घालून प्रिहिटेड ओव्हन मध्ये ३५० °F (१८०°C) ला ३५ ते ४० मिनिटे.
६. एक टूथपिक केकमध्ये खूपसून बाहेर काढल्यावर क्लीन बाहेर आली तर केक झाला असं समजा. केक झाल्यानंतर ५ मिनिटं ओव्हन स्विच ऑफ करून ओव्हनचं दार उघड ठेवा.
मग केक पॅन बाहेर काढून तो कूलिंग रॅकवर ( नसेल तर डिशमध्ये / कटिंग बोर्डवर) उपडा करा. एगलेस बेसिक व्हॅनिला केक तयार 🙂

आणि मग हवा तसा सजवा.

मी केकचा वरचा खडबडीत भाग सुरीने काढून टाकून केकचे ४ भाग करून थोडं बटर आयसिंग आणि (चेरी नसल्याने) मिक्स फ्रूट जॅमने  सजवलं आहे 🙂

टीपः
१) १ कप = १ आमटीची चांगली मोठी वाटी.
२) ऑल पर्पज फ्लोर (किंवा मैदा) चाळल्यामुळे केक जास्त फ्लपी होतो म्हणतात.

Advertisements

5 thoughts on “२) एगलेस बेसिक (व्हॅनिला/चॉकलेट) केक : (दही घालून)”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s