१) स्वयंपाकघरातील काही टिप्स – रोजचा स्वयंपाक

  • रोजचा स्वयंपाक करताना उपयोगी पडणार्‍या ट्रिक्स आणि टीप्स:

१) कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून उतू जाऊन भात कुकरमध्ये सांडतो. हे टाळण्यासाठी कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे (पाव चमचा) मीठ पण घालावं म्हणजे कुकरमध्ये भात सांडत नाही.

२) कणिक मळताना ती परातीत/ताटात न मळता कढई/तसराळे/मोठा बाऊल यात मळली तर मळायला सोपी जाते.

३) कधीही काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेला/तूपात तळायचे असतील मंद गॅसवर तळायचे असतात किंवा तेल जास्त गरम झाले असल्यास पॅन थोडा वेळ गॅसवरून उतवरून तेल थोडे गार होऊ द्यायचे आणि मग त्यात काजू टाकायचे म्हणजे मग करपणार नाहीत

४) नेहमी अन्न झाकून ठेवायची सवय लावून घ्यावी. म्हणजे त्यावर माश्या-चिलटं बसत नाहीत. नकळत पदार्थामध्ये धूळ, किडामूंगी वगैरे पडत नाही.

५) नेहमीच्या तूरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक(अगदी ४-५ पाने घातली तरी चालते.) चिरून  घातला तर आमटीला छान आणि वेगळी चव येते. आणि त्यायोगे पालकही खाल्ला जातो.                  घरी थोडे वरण शिल्लक आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी काही भाजी / काही तोंडी लावणं करायच आहे अशा वेळी जर घरी पालक असेल तर तूरीच्या डाळीची नेहमीप्रमाणे आमटी करावी व भरपूर पालक चिरून घालावा व चांगला शिजू द्या. ही पालकाची झटपट पातळ भाजी तयार.

६) कोबीची भाजी उरली असेल आणि परत ती भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ती गॅसवर परतून घेऊन त्यात डाळीचं पिठ १-२ चमचे घालून (१ वाटी भाजी असेल तर १/२ चमचा डाळीचं पीठ या प्रमाणात) घालून परतून घ्या आणि नेहमीप्रमाणे कणिक मळून कणकेत हे सारण स्टफ करून कोबीचे स्टफ्ड पराठे बनवा.

७) कोणत्याही पाककृतीत पनीर वापरायचे असल्यास, पनीरचे क्यूब्ज करून घ्या आणि एका भांड्यात उकळते गरम पाणी घेऊन त्यात हे क्यूब्ज १०-१५ मिनिटे ठेवा. मग एका चाळणीत ५ मिनिटे पनीर निथळत ठेवा. आता हे सॉफ्ट पनीर हव्या त्या डीशमध्ये वापरण्यासाठी तयार.

८) कोणताही पुलाव/जिरा राइस/स्पेशल भात जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल तेव्हा, तांदूळाच्या दीडपट पाणी घालावे आणि २ शिट्ट्या कराव्यात. भात मोकळा/फडफडीत होतो.

९) गरमागरम इडली, इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे. यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट निघतात.

१०) काही भाज्या/उसळी/भात करताना तयार (बारीक पूड केलेले) मसाले फोडणीत टाकले की चांगला स्वाद येतो. अशा वेळी हे मसाले डायरेक्ट फोडणीत टाकले तर ते करपतात. त्याऐवजी १ चमचाभर तेलात थोडा मसाला (पूड) घालून मग ते तेल फोडणीमध्ये घातले तर मसाले करपत नाहीत आणि मसाल्याचा स्वादही पदार्थात चांगला उतरतो.

  • फ्रीज:

१) कोथिंबीर आणल्यानंतर शक्यतो त्याच दिवशी निवडावी. मग एक प्लॅस्टिकचा आडवा डबा घेऊन त्यात एखादे मोठ्या रूमालाइतके सूती/कॉटनचे कापड ठेवून त्यात ही निवडलेली कोथिंबीर ठेवली व त्याच कापडाच्या टोकांनी झाकली आणि मग डब्याचे झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवले असता बरेच दिवस ताजी रहते. फक्त जेव्हा जेव्हा कोथिंबीर घेण्यासाठी डबा उघडू त्यावेळी जर एखादे खराब झालेले पान दिसले तर ते लगेच काढून टाकायचे.

२) कढिलिंबाची पानं काढून ती एखाद्या एअर टाइट डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवल्यास खूप दिवस चांगली रहातात. कढिलिंब घेण्यासाठी जेव्हा जेव्हा डबा उघडू तेव्हा जर काही पानं खराब झाली असतील तर ती पाने काढून टाकायची.

३) कोथिंबीर फ्रीजमध्ये खूप दिवस ताजी रहाण्यासाठी, कोथिंबीर निवडताना फक्त पानं पानं सुटी न करता त्याचे मोठे मोठे दांडे काढून टाकावेत आणि छोटी छोटी देठं तशीच राहू द्यावीत. आणि मग ही कोथिंबीर एका जाड किचन टॉवेलमध्ये (म्हणजेच जाड/चांगल्या प्रतीच्या टिश्यू पेपरमध्ये) गुंडाळून एका प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून ती पिशवी दुसर्‍या एका प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. १०-१२ दिवस सहज टिकते. अधेमधे कोथिंबीर वापरायला काढताना तो टिश्यू पेपर जर दमट वाटला तर तो टिश्यू पेपर काढून टाकून दुसर्‍या टिश्यू पेपरमध्ये ती कोथिंबीर गुंडाळून वरील पद्धतीने फ्रीजमध्ये ठेवावी.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s