व्हेज राइस

व्हेज पुलाव किंवा बिर्याणी करायचा कंटाळा आला असेल तर हे सोपं वर्जन करून पहा. किंवा संध्याकाळी हलका आहार घ्यायचा असेल तर जेवण्यासाठी चांगला ऑप्शन.

साहित्यः
तेल, हिंग, जिरे, हिरव्या मिरच्या १-२, (फ्लॉवर, गाजर, श्रावण घेवड्याच्या शेंगा) या भाज्यांचे काप, मटार, स्वीटकॉर्न, भरपूर (उभा चिरलेला कांदा), तांदूळ, मीठ, बटर किंवा तूप, काजू, लिंबूरस

कृती:
१) एका कुकरमध्ये तेल घेऊन तेल तापले की हिंग-जिर्‍याची फोडणी करून घ्या. त्यात काजू घालून परता. मग १-२ मिरच्यांचे तुकडे घाला. आता त्यात भरपूर कांदा घाला. कांदा चांगला परतून घ्या.
२) मग त्यात सगळ्या भाज्या (फ्लॉवर, गाजर, श्रावण घेवड्याच्या शेंगा,मटार, स्वीटकॉर्न) घालून चांगले परता. तांदूळ धुवून घेऊन त्यात घाला. चांगले परता. आता थोडे तूप/बटर घालून परता.
३) आता त्यात पाणी, चवीनुसार मीठ, ३-४ थेंब लिंबाचा रस घाला. (लिंबाच्या रसामुळे भात छान पांढरा स्वच्छ दिसतो असं ऐकल आहे, म्हणून मी घालते.) फोडणीत मिरची घालायची विसरल्यास आता घातली तरी चालेल.
४) आता कुकरचे झाकण लावून ३ शिट्ट्या करा. मस्त वाफाळता व्हेज राइस तयार.
५) (उभा चिरलेला) कांदा, त्याला तेल लावून मायक्रोवेवमध्ये अंदाजे २-३ मिनिटे ठेवून क्रिस्पी करून घ्या.
हा कांदा व्हेज राइसवर घाला.

टीपः
१) यामध्ये फोडणीत कांदा चांगला परतून झाला की मग खडा मसाला/ पुलाव मसाला / बिर्याणी मसाला २-३ चमचे घातला तर छान पुलाव/बिर्याणी तयार होते.
२) फोडणी करताना मिरची घालायला विसरलात हे कुकरचे झाकण लावेपर्यंतच्या कोणत्याही क्षणी आठवले तर तेव्हा मिरची घालू शकता.
३) याच्यावर कमी तेलावर तळलेला क्रिस्पी कांदा छान लागतो. हा क्रिस्पी कांदा मी मायक्रोवेवमध्ये करते. यासाठी कांदा उभा चिरून त्यावर २-३ चमचे तेल टाकून ते चिरलेल्या कांद्याला लावून घ्यावे. मग तो पसरून एका पसरट मायक्रोवेवेबल डिशमध्ये ठेवावा. आणि ती डीश मायक्रोवेवमध्ये साधारण ३-४ मिनिटे ठेवावी. अधे मधे कांदा करपणार नाही ना हे पहात रहावे. तळलेला क्रिस्पी कांदा तयार. (क्रिस्पी कांदा तयार होण्यासाठी लागणारा वेळ हा मायक्रोवेवची वॅट पॉवर, कांद्याची क्वांटीटी इ. गोष्टींवर अवलंबून असल्याने प्रत्येकाला क्रिस्पी कांदा बनवण्यासाठी वेगवेगळा वेळ लागू शकतो. )

Advertisements

2 thoughts on “व्हेज राइस”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s