३) एगलेस ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री

हा माझा एकदम आवडता केक. आणि बनवायलाही सोपा आहे. तर बघू आज एगलेस ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री कशी बनवायची.

यासाठी लागणारे साहित्यः
१) तयार बेसिक एगलेस चॉकलेट केक:
चौकोनी/गोल/हार्ट शेप जो आवडेल त्या आकाराचा कोणताही तयार बेसिक चॉकलेट केक घ्यावा. मी यासाठी ‘२) एगलेस बेसिक (व्हॅनिला/चॉकलेट) केक : (दही घालून)‘ ही रेसिपी वापरून केक केला होता.

२) केकवर स्प्रिंकल करण्यासाठी/शिंपडण्यासाठी,
फ्रीजमधलं थंडगार,                                                                                                                          ऑरेंज ज्यूस / (गार पाणी + साखर + चिमूटभर इन्स्टंट कॉफी) / (गार पाणी + साखर) / गार पाणी
मी केकवर स्प्रिंकल करण्यासाठी साखर-पाणी असं तयार करते,
एक छोटी वाटी भरून बारीक साखर घ्या. त्यात साखर बुडेल इतके पाणी घाला. मग हे मिश्रण एका छोट्या पातेल्यात घेऊन गरम करायला ठेवा. चमच्याने हलवत रहा. साखर विरघळली की गॅस बंद करून पातेलं खाली उतरवा. त्यात चिमूटभर इन्स्टंट कॉफी घाला. आणि हे मिश्रण थोडं रूम टेंपरेचरला आल्यावर फ्रीजमध्ये ठेवा.

३) व्हिप्ड क्रिम आणि चेरी

४) चॉकलेट बारचा चुरा:
तुम्हाला आवडेल त्या स्वीट / सेमी स्वीट / डार्क चॉकलेट चा बार घ्या. आणि चॉकलेट बार हातामध्ये उभा धरून त्यावर दाब देऊन मोठ्या खिसणीने चॉकलेट खिसून घ्या. किंवा सालकाढणी वापरून चॉकलेट बारचे फ्लेक्स बनवून घ्या.

५) डेकोरेशन करण्यासाठी केक डेकोरेशनचा कोन किंवा मेंदीचा करतो तसा मोठा प्लास्टिकच्या कागदाचा / पार्चमेंट पेपरचा कोन.

६) (ऑप्शनल) मिक्स फ्रूट जाम किंवा गोड स्ट्रॉबेरी जाम/स्प्रेड
जाम/स्प्रेड वापरल्याने केकचे लेयर्स एकमेकाला छान चिकटतात.

कृती:
१) प्रथम एक फ्रीजमध्ये ठेवून गार केलेला चॉकलेट केक घेऊन त्याचे धारदार सुरीने आडवे दोन भाग करून, दोन लेयर तयार करून घ्यावे. हे करताना केक गोल फिरवून सुरीने कापून घेतल्यास केक जास्त समसमान कापला जाइल. केकचा वरचा भाग(लेयर) बाजूला काढून ठेवा.

२) आता केकवर स्प्रिंकल करण्यासाठी साहित्यात लिहिल्याप्रमाणे (गार पाणी + साखर + चिमूटभर इन्स्टंट कॉफीचे) तयार केलेले मिश्रण घ्या. ते केक थोडासा ओलसर होईल इतपतच चमच्याने केकवर शिंपडा किंवा ब्रशने केकला लावून घ्या. जास्त नको. नाहीतर केक जड होईल. त्याचा स्पाँजीनेस जाऊन केक खाली बसेल. (यावेळी मी इन्स्टंट कॉफी घालायची विसरले होते.)

३)  आता त्यावर भरपूर व्हिप्ड क्रिम लावून घ्या.

४) नंतर त्यावर चेरीचे तुकडे घाला.

५) आता त्यावर गोड स्ट्रॉबेरी जाम अधेमधे घाला.

६) आता त्यावर बाजूला ठेवलेला केकचा वरचा थर(लेयर) ठेवा.

परत स्टेप २) आणि ३) रिपिट करा.

७) वेळ असेल तर ही स्टेप करा, वेळ नसेल तर ही स्टेप गाळली तरी चालेल.
हा केक आता फ्रिजमध्ये  १५/२० मिनिटे ठेवून परत बाहेर काढा. आणि परत एक व्हिप्ड क्रिमचा थर द्या. आता हा थर केकवर जास्त चांगला बसेल.


हा चॉकलेटचा चुरा.


८)आता कोनमध्ये व्हिप्ड क्रीम भरून केकवर जिथेजिथे चेरी ठेवणार असाल तिथेतिथे गोलाकार नक्षी करून घ्या. आता त्यावर चेरी ठेवा. आणि केकवर चेरीच्या आजूबाजूला चॉकलेटचा चुरा/फ्लेक्स घाला. केकच्या बाकी सर्व बाजूंनाही चॉकलेटचा चुरा/फ्लेक्स लावा.

अशी मस्त एगलेस ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री तयार आहे. चला आपापले फोर्क घेऊन या आणि पटकन गट्टम करा 🙂

Advertisements

4 thoughts on “३) एगलेस ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s