टोमॅटोचे सार

टोमॅटोचं सार… माझं एकदम फेवरेट आहे. हे गरम गरम भाताबरोबर एकदम सह्ही लागतं. १ नंबर Smile आणि नुसतं खायलाही मस्तच लागतं. करायला पण एकदम सोपं.

साहित्यः ४-५ लाल टोमॅटो, ४-५ लसूण पाकळ्या (मोठा लसूण असेल तर २ बास होतील) किसून किंवा पेस्ट करून, १ टीस्पून किसलेल आलं किंवा आलं पेस्ट (लसूण पेस्ट च्या निम्मी आलं पेस्ट घ्या), अर्धी-पाऊण वाटी खोवलेलं ओलं खोबरं, १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी, चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून हळद, २-३ टेबलस्पून तेल, चवीनुसार तिखट, मीठ, साखर

कृती:
१. प्रथम टोमॅटो कुकरला लावून शिजवून घ्या. मग टोमॅटोची सालं काढून शिजलेले टोमॅटो मिक्सरमधून फिरवून त्याची प्युरी करून घ्या.
२. एका कढईत/पॅनमध्ये तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद टाकून फोडणी करून घ्या. मग त्यात आलं-लसूण किस/पेस्ट टाकून परतून घ्या. मग त्यात टोमॅटो प्युरी घाला. परतून घ्या
३. मग त्यात सारं जितकं दाट-पातळ हवं आहे तितकं पाणी घाला. मी ४-५ कप पाणी घातले आहे. चवीनुसार तिखट, मीठ, साखर घाला. साखर नेहमीपेक्षा थोडी जास्त घाला. आता त्यात खोबरं-कोथिंबीर घालून उकळी आणा.
४. आणि असं मस्त गरम गरम सार वाफाळत्या भाताबरोबर फस्त करा.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s