नसतेस घरी तू जेव्हा… (विनोदी)

नसतेस घरी तू जेव्हा…     ( विनोदी विडंबन )
कवी – केशवसुमार

नसतेस घरी तू जेव्हा
जीव हलका हलका होतो
पीण्याला जमती सारे
अन्‌ एकच गलका होतो

नभ फाटून वीज पडावी
जल्लोश तसा मी करतो
ही शुद्ध जरा क्षीण होते
अन्‌ पती बोलका होतो

येताच विड्या ओठांशी
मी दचकून बघतो मागे
खिडकीशी थांबून ओढा
मग गंध तयांचा जातो

तव घरात अवतरण्याच्या
मज स्मरती घातकवेळा
घर भरभर अवरून सगळे
मी पुन्हा सात्त्विक होतो

तू सांग सख्या मज काय
तू केले मी नसताना ?
माझा मग जीव उगाच
भात्यासम धडधड करतो

ना अजून झालो चालू
ना हुशार अजुनी झालो
तुज पाहून मी डगमगतो
अन् चरणा वर तव पडतो !

——————————————————————————————————

टीप – कवीच्या पूर्वपरवानगीने ही कविता या ब्लॉगवर पोस्ट केली आहे.

Advertisements

7 thoughts on “नसतेस घरी तू जेव्हा… (विनोदी)”

    1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद महेश. मला पण ही विनोदी कविता आवडते 🙂
      [ ही कविता माझी नाहिये, केशवसुमारांची आहे. ]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s