मसूराची उसळ (मसूर उसळ)

साहित्यः मसूर, गोडा मसाला, गूळ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, तेल, जिरे-मोहरी, हिंग, हळद, कढिलिंब, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ

कृती:
१) मसूरामध्ये भरपूर पाणी घालून मसूर १०-१५ मिनिटं भिजत ठेवा. (ही स्टेप ऑप्शनल आहे.)

२) मसूर कुकरला शिजवून घ्या. मग एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाले की त्यात जिरे-मोहरी घाला. मोहरी तडतडली की त्यात हिंग, हळद, कढिलिंब घाला.

३) आता कांदा घाला. कांदा चांगला परतून झाला की टोमॅटो घालून परता. त्यात मसूर घाला. परता. मग गरजेनुसार पाणी घाला आणि चवीनुसार मीठ, गूळ, गोडा मसाला घालून एक उकळी आणा.

४) वरून कोथिंबीर घाला. मसूर उसळ तयार.

टीपः मसूर भिजवायची स्टेप ऑप्शनल आहे. पण शक्य असेल तर जरूर करा. १०-१५ मिनिटांपासून ते रात्रभर यापैकी कितीही वेळ मसूर भिजवून ठेवला तरी चालेल. मसूर भिजला की चांगला आणि लवकर शिजतो म्हणून भिजत घालायचा.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s