चॉकलेट गनाश

साहित्यः अर्धा कप चॉकलेट चिप्स (सेमीस्वीट किंवा स्वीट आवडेल तसे), १/३ कप हेवी क्रीम (किंवा हेवी व्हिपिंग क्रिम), १ टीस्पून रूम टेंपरेचरला आलेलं बटर, १/८ टीस्पून मीठ, १/८ टीस्पून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट/इसेन्स (ऑप्शनल)

कृती:
१) एका पॅनमध्ये मध्यम आचेवर क्रीम गरम करत ठेवा. आणि क्रीम उकळायच्या थोडंस आधी (म्हणजेच पॅनच्या कडेने हवेचे बुडबुडे जमा झालेले दिसले की) गॅस बंद करा.
२) आता एका बाउलमध्ये चॉकलेट चिप्स घेऊन त्यावर हे गरम क्रीम ओता. १ मिनिट तसचं राहू द्या. आता त्यात बटर, मीठ, व्हॅनिला एक्सट्रॅक्ट घालून चमच्याने किंवा व्हिस्कने फेटून चांगले एकत्र करून घ्या.
३) ४-५ मिनिटे तसेच राहू द्या. आता हे गनाश केक / पेस्ट्री / कुकीज सजवण्यासाठी वापरू शकता किंवा व्हॅनिला आइसक्रिम वर घालून खाऊ शकता.

हा चॉकलेट गनाशने डेकोरेट केलेला चॉकलेट केक. हा केक डेकोरेट करून फ्रीजमध्ये ठेवला होता. मस्त लागतो गनाशमुळे.

पण केक डेकोरेट करण्यासाठी गनाश वापरण्याची खरी मजा तेव्हा येते, जेव्हा असं केलं जातं,
फ्रीजमध्ये ५-६ तास ठेवलेल्या केकवर गनाश ओतायचे, सगळ्या बाजूनी ओघळू द्यायचे ( आणि त्या सुंदर केकचा फोटो काढून ठेवून) मग केक कट करून खायचा 🙂

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s