उकडीचे मोदक

उकडीचे मोदक…  अम्मं…  yummy

माझे एकदम फेवरेट आहेत. पण जनरली उकडीचे मोदक, पुरणाच्या पोळ्या & so on…  यासारख्या पाककृती म्हणजे नवशिक्यांसाठी ‘डी’ ग्रुपचे Questions असतात. त्यामुळे मी कधीच या पदार्थांच्या मागे लागले नाही. पण या गणेश चतुर्थीला आयते मोदक मिळण्याचे दूरदूरपर्यंत काही चान्सेस नसल्याने ‘मोदक पहावे करून’ असा विचार मनात येऊ लागला. मग ४-५ साइट्सवर कृती पाहिली. प्रत्येक ठिकाणी घटक पदार्थांचे वेगवेगळे प्रमाण दिले होते. मग म्हंटल राहू दे, कधीच केली नाहिये उकड वगैरे. जाउ दे कशाला नादी लागायच या मोदकांच्या.

फेसबुकवर एका मैत्रिणीशी बोलताना तिला मोदकांबद्दल सांगितले, तर तिनेही आग्रह धरला की तू करच मोदक. सोपी रेसिपी असते. तुला जमतील. मग तिच्याकडून उकडीची रेसिपी घेतली. आणि सारण कसे बनवायचे ते साधारण माहितीच होते. मनात आलं, ट्राय तर करून पाहू. जमलं तर जमलं, नाही तर नाही. असं हो ना करता, पहिल्यांदाच मोदक केले आणि छान झाले. त्याचीच कृती इथे देत आहे. नवशिक्यांना सुद्धा सोपे पडेल अशी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा.

साहित्यः
उकडीसाठी: १ मोठी वाटी तांदूळाची पिठी, १ मोठी वाटी पाणी, चिमूटभर मीठ, १/२ टीस्पून साखर (किंवा २ चिमूट साखर), १ टीस्पून तेल, १ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
सारणासाठी: १ मोठी वाटी खोवलेले ओले खोबरे, पाऊण (मोठी) वाटी गूळ, १/२ टीस्पून वेलदोडे पूड, २ टेबलस्पून तूप, १/२ टीस्पून खसखस, २ टेबलस्पून काजू-बदाम-अक्रोड इत्यादी सूक्या मेव्याचे बारीक तुकडे (ऑप्शनल)

कृती:
आधी सारण करून घ्या. म्हणजे उकड करून होईपर्यंत सारण गार होईल.
सारणः
१) एका पॅनमध्ये तूप घेऊन ते गरम झाले की त्यात खसखस घाला. ती परतली की त्यात खोबरे घालून परतून घ्या.
२) आता त्यात गूळ, वेलदोडे पूड घालून चांगले एकत्र परता.
३) ५-१० मिनिटे मध्यम आचेवर (झाकण न ठेवता) मिश्रण चांगले शिजवून घ्या. मग त्यात सुक्या मेव्याचे तुकडे चांगले परतून घ्या आणि गॅसवरून उतरवून ठेवा. सारण तयार.

उकडः
१) १ वाटी पाणी घेऊन ते जाड बुडाच्या पॅनमध्ये/पातेल्यामध्ये/ कढईमध्ये किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये मध्यम आचेवर उकळत ठेवा. (मी नॉनस्टिक पॅन वापरला.)
२) उकळी आल्यावर त्यात मीठ, साखर, तेल घाला.
३) मग पॅनच्या मध्यभागी तांदूळ पिठी आणि कॉर्नफ्लोअर घालून एका डावाने चांगले मिक्स करून घ्या. लगेचच त्या पॅनवर घट्ट बसणारे झाकण ठेवा. (ज्यामुळे वाफ आत कोंडून राहील.)
४) गॅस बंद करून पॅन गॅसवरून उतरवून ठेवा. ५-६ मिनिटांनी पॅनवरचे झाकण काढा. उकड खूपच गरम असेल तर १-२ मिनिटे अजून झाकून ठेवा.
५) मग ती उकड एका मोठ्या बाऊलमध्ये/ तसराळ्यामध्ये घेऊन तेलाचा आणि पाण्याचा हात लावून थोडी गरम असतानाच (कणकेसारखी) चांगली भरपूर मळून घ्या. त्यावर झाकण ठेवा. उकड तयार.


मोदकः
१) तयार उकडीचा मोठ्या (जंबो) पेढ्याएवढा गोळा करून त्याची जमेल तितकी पातळ पारी (साधारण तळहाताएवढा किंचित खोलगट द्रोण) बनवून घ्या.
२) मग त्या पारीला दिवाळीतल्या खूप वातींच्या पणतीसारखे फोल्ड्स करून घ्या. मग हलकेच छोट्या चमच्याने त्यात सारण भरून घ्या.
३) आणि त्याचा फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे मोदक करून घ्या.
४) एका चाळणीला हाताने चांगले तेल लावून घ्या. प्रत्येक मोदक तयार झाला की हलकेच पाण्यात बुडवून तो या चाळणीवर थोडे थोडे अंतर ठेवून ठेवावा.
५) मग ही चाळणी कुकरमध्ये किंवा इडली पात्रात किंवा एका मोठ्या पॅनमध्ये १५ मिनिटे वाफवून घ्यावा.

मी मोदक मोठ्या पॅनमध्ये वाफवून घेतले. यासाठी मी मध्यम आचेवर एक मोठा पॅन थोडं पाणी घालून गरम करत ठेवला. त्यामध्ये मध्यभागी छोट्या कुकरचे स्टीलचे भांडे ठेवले. त्यातही थोडे पाणी घातले. त्यावर ही चाळणी ठेवली आणि वरून ग्लास लिड लावले आणि १५ मिनिटे मोदक वाफवून घेतले.


टीप:
१) मी फ्रोजन खोबरे वापरले होते. फ्रोजन खोबरे वापरणार असाल तर, शक्य असेल तर, ते १-२ तास आधी फ्रीजबाहेर काढून ठेवावे.  माझं ऐनवेळी मोदक करायचे ठरल्याने मी फ्रीजमधून काढून ते लगेचच वापरले. अशा वेळी सारण करताना ते खोबरे तूपावर मंद गॅसवर परतून त्यात डाव खूपसून ते सुटे करण्याचा प्रयत्न  करावा आणि साधारण सुटे झाले की मग त्यात गूळ घालावा.
२) कृतीमध्ये जिथं १ वाटी लिहिलं आहे तिथे १ मोठी वाटी असंच प्रमाण धराव जे साहित्यामध्ये लिहिलं आहे.
३) सारण खूप वेळ गॅसवर राहिले असता ते ड्राय होते किंवा चिक्कीसारखे घट्ट होते. म्हणून सारण बनवताना खोबरे आणि गूळ व्यवस्थित मिक्स झाले आणि साधारण मऊसर झाले की सारण तयार झाले असं समजावे आणि गॅसवरून खाली उतरवून ठेवावे.
४) उकड खूप चिकट असल्याने प्रत्येक मोदक करताना हाताला तेल लावावे.
५) मोदक बनवण्याची माझी रीतः
कृतीत दिल्याप्रमाणे मोदकात सारण भरले की मग,
उजव्या हातात मोदक घेऊन डाव्या हाताच्या अंगठा आणि त्याजवळचे बोट याचा मोदकाभोवती वेढा घालून हळूहळू मोदकाचे फोल्ड्स जवळजवळ आणायचा प्रयत्न करा.
हे फोल्ड्स साधारण एकमेकांना चिकटले की मग मोदक डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने हळूवार सर्व फोल्ड्स एकत्र करून मोदक बंद करून त्याला फोटोत दिल्याप्रमाणे वर एक उंचवटा ठेवावा.

Advertisements

4 thoughts on “उकडीचे मोदक”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s