ब्लॉगवर काय लिहावे?

 • ब्लॉगवर काय लिहावे?

ब्लॉगवर मनातलं अगदी काहीही लिहावं. माहिती असलेलं काहीही…, शेअर करावं असं वाटणारं काहीही…, असं काहीही लिहावं.

 • (विशेषतः मराठी) ब्लॉगवर का लिहावं?

आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल काहीही माहिती हवी असेल (मग ती कोणत्याही विषयाबद्दल असो) तर ती मिळवण्याचा सगळ्यात सोपा उपाय काय बरं. (उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे.) तरं हे उत्तर आहे गुगल करणे. ‘गुगल करणे’ हा आजकाल एक नवीन वाक्यप्रचार झाला आहे.

पण खरं पहाता ‘गुगल’ हे एक सर्च इंजिन आहे. गुगल केल्यावर लगेच हवी ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम गुगल करतं. पण आपल्याला हवी ती माहिती कशी मिळते, ती गुगलकडे कुठून आली तर याचं उत्तर आहे की ती माहिती आधी कोणीतरी डॉक्युमेंट केली आहे. (लिहून ठेवली आहे/संकलित केली आहे). म्हणजेच ज्याने कोणी हे काम केले आहे त्याचा उपयोग आपल्याला झाला. गुगलने फक्त मध्यस्थाची भूमिका चोख बजावली.

ही सगळी प्रोसेस (प्रक्रिया), याचा ‘ब्लॉगवर काय लिहावे?’ या प्रश्नाशी घनिष्ट संबंध आहे. विशेषतः या लेखात/पोस्टमध्ये मला ‘मराठी ब्लॉगवर काय लिहावे?’ याबद्दल लिहायचं आहे.

मला असं वाटतं की ज्याबद्दल आपल्याला ज्ञान आहे,  जे जे आपल्याला माहिती आहे, मग भले ती गोष्ट क्षुल्लक का असेना, ते पोस्ट छोटे का असेना, ते ब्लॉगवर लिहावे. आपले अनुभव, आपल्याला येत असलेल्या पाककृती, जीवनाने आपल्याला शिकवलेल्या चार गोष्टी … असं काहीही उपयुक्त. ज्याचा दुसर्‍याला फायदा होइल, उपयोग होइल असे काहीही.

त्यामुळे काय होईल की मराठी शब्द सर्चला दिल्यावर त्यासंबंधीची (ही) उपयुक्त माहिती/ज्ञान मराठीतून उपलब्ध होईल आणि हे किती छान होईल. कोणत्याही सर्च इंजिनला कोणताही इंग्लिश भाषेमधला शब्द सर्च करायला द्या. ढीगभर रिझल्ट मिळतील. म्हणजे कोणत्याही गोष्टीबद्दलची अमाप माहिती इंग्लिश भाषेत उपलब्ध आहे. हेच मराठीच्या बाबतीत त्या मानाने कमी माहिती उपलब्ध आहे.

या आंतरजालावरची (इंटरनेटवरची) मराठी भाषेतली लेखनसंपदा वाढवण्यात आपण आपल्या परीने हातभार लावू शकतो असं मला वाटतं.

म्हणजे ब्लॉगवर आपल्या कविता, लेख, चारोळ्या वगैरे वगैरे पण अवश्य लिहावे. पण बरेचदा आपल्याकडे सांगण्यासारख्या छोट्या-मोठ्या गोष्टीही असतात. त्याबद्दल ‘ह्यात काय लिहिण्यासारखे आहे’, ‘ही तर छोटी गोष्ट आहे. त्यात काय विशेष’ असं न वाटून घेता कोणत्याही बाबतीतले आपले ज्ञान इतरांबरोबर शेअर केले तर खूप छान होईल. आणि इंटरनेटवर मराठी भाषेतल्या साहित्यसंपदेत / माहितीच्या खजिन्यात आपल्याकडून खारीच्या वाट्याइतकी भर तर नक्कीच पडेल 🙂

Advertisements

5 thoughts on “ब्लॉगवर काय लिहावे?”

  1. अगदी बरोबर आहे.
   ब्लॉगवर मनातलं काहीही लिहावं, आवडेल त्या गोष्टीबद्दल लिहावं.
   थोडक्यात बिनधास्त, मनमुराद ‘काय वाटेल ते’ लिहावं 🙂

 1. मराठीत लिहिण्यासाठी,
  १) गमभन या साइटवरून गमभन हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करा:
  यासाठी प्रथम ‘http://www.gamabhana.com/?q=download’ या लिन्कवर जा.
  मग ‘Download gamabhana LITE for offline use – (V 110327)’ या लिन्कवर क्लिक करा.
  मग ‘Save File’ ऑप्शन निवडा

  २) सेव्ह झालेली फाइल एक्सट्रॅक्ट करा. (एक्स्ट्रॅक्टेड फाइल्सचा) जो फोल्डर तयार होईल त्यामधल्या ‘index.html’ वर राइट क्लिक करा. आणि ‘Send To’ -> ‘Desktop’ हा ऑप्शन निवडा. आता डेस्कटॉपवर या ‘index-shortcut’ नावाचं आयकन दिसेल.

  ३) ‘index-shortcut’ आयकन वर डबल क्लिक करा. जे पेज उघडेल त्यावरच ‘Clear Editor’ नावाचं बटन दाबा.
  आणि मग त्या पेजवर मराठी लिहायला सुरूवात करा 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s