२) स्वयंपाकघरातील काही टिप्स – क्लिनिंग

  • क्लिनिंगः

१) भजी/वडे तळून उरलेले तेल तसेच पडून रहाते. मग त्याला वास येतो आणि ते टाकून द्यावे लागते. म्हणून हे तळणीचे तेल गार झाल्यानंतर लगेच एका स्टीलच्या गाळणीने गाळून एका छोट्या डबीत/डब्यात ठेवावे. (हे तेल २-३ दिवसात भाजी/आमटीला किंवा पोळी करताना वापरून टाकावे.)
मग तळण केलेले भांडे/पातेले/कढई कोरड्या कणकेने (गव्हाचे पीठ) पुसून घ्यावे. असं केल्याने तळणाचे भांडे पटकन आणि स्वच्छ धुवून निघते. दुसरे दिवशी कणिक मळताना हे तेल पुसलेले पीठ वापरून टाकावे.

२) तूपाचे भांडे/तामली/बरणी धुवायची असेल तर त्यामध्ये आधी बारीक रवा भरपूर घालून चांगले पुसून घ्यावे आणि मग भांडे घासावे. पटकन आणि स्वच्छ धुवून निघते.
हा रवा मग चांगला भाजून ठेवावा. शिरा/उपीट करताना लगेच वापरता येतो.

३) देवासमोरची निरांजने/दिवे खूप वापरून तेलकट/चिकट झाली असल्यास किंवा चांदीचे दिवे/समया यावर तेलाचा राप बसला असल्यास भरपूर पांढरी रांगोळी या भांड्यावर चोळून चोळून घासावी. कितीही तेलकट/तूपकट राप बसला असला तरी निघून जातो. चांदीची चिकट भांडी तर नव्यासारखी चमकतात.

४) चांदीची काळवंडलेली भांडी कोलगेट पेस्ट किंवा टूथ पावडरने धवावीत. आणि मऊ कापडाने पुसावीत. चमकदार होतात.

५)रोज कुकर लावताना जे पाणी कुकरमध्ये घालतो त्यात १ छोटीशी (ताजी/वाळलेली/रस असलेली/नसलेली कशीही) लिंबाची फोड टाकली तर कुकर छान चकाचक स्वच्छ रहातो/होतो, घासायला सोपा जातो.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s