आपल्या ब्लॉगचा विजेट कोड (किंवा आयकॉन / लोगो / ब्लॉग बटण) कसे बनवायचे?

स्वतःच्या वर्डप्रेस ब्लॉगचे आयकॉन (Icon) कसे बनवायचे? स्वतःच्या ब्लॉगचा विजेट कोड कसा बनवायचा? ब्लॉग बटण कसे बनवायचे? लोगो कसा बनवायचा?

या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे. आणि उत्तर सोपे आहे. अगदी सोप्प आहे.
मला स्वतःला हे आयकन बनवायचे होते. खरं तर साधी गोष्ट आहे पण इतका वेळ लागला R & D करून स्वत:चे विजेट बनवायला की बस्स. R & D करायला २ तास आणि विजेट करायला २ मिनिटे.
चला तर जाणून घेऊ की हे करायचं कसं?(१) ज्यांना थोडीफार माहिती आहे त्यांच्यासाठी सोप्या स्टेप्सः

१) तुमच्या कॉम्प्युटर/लॅपटऑप मधला कोणताही फोटो निवडा. तो ‘१२५ बाय १२५’ पिक्सेल इतक्या लहान आकारात दिसणार आहे, त्यानुसार फोटो निवडा.
२) हा फोटो पिकासा वेबवर अपलोड करा. आणि फोटोवर राइटक्लिक करून ”View Image Info” क्लिक करून” निळी हायलाइटेड लाइन कॉपी करा. ही आहे तुम्ही अपलोड केलेल्या फोटोची लिन्क.
३) तुमचा ब्लॉगची लिन्क आणि तुम्ही अपलोड केलेल्या फोटोची लिन्क एका नोटपॅडमध्ये पेस्ट करा.
४) आता शेवटची पायरी. खाली दिलेला कोड नोटपॅडमध्ये कॉपी करा.
<a href=”AAA” target=”_blank”>
<img src=”BBB” width=”125″ height=”125″ />
</a>
त्यातल्या AAA च्या जागी तुमच्या ब्लॉगचा अ‍ॅड्रेस लिहा आणि BBB च्या जागी तुमच्या फोटोची लिन्क द्या.
तुमचा विजेट कोड तयार 🙂

(पुढच्या पोस्टमध्ये हा विजेट कोड आपल्या वर्डप्रेस ब्लॉगवर कसा लावायचा ते पाहू.)

(२) Beginners साठी (नवशिक्यांसाठी) सविस्तर स्टेप्सः

१) फोटो सेलेक्ट करणे:
तुम्हाला आवडणारा तुमच्या कॉम्प्युटरमधला / लॅपटॉपमधला कोणताही एक फोटो सिलेक्ट करा (ठरवा).  हा फोटो सिलेक्ट करताना हे लक्षात असू द्या की हा फोटो १२५ पिक्सेल बाय १२५ पिक्सेल इतक्या छोट्या आकारात दिसणार आहे. त्या दृष्टीने फोटो choose करा / सिलेक्ट करा.
उदा. इतका लहान दिसणार आहे हा फोटो.

२) फोटो अपलोड करणे:
हा फोटो पिकासा वेबवर अपलोड करा. (किंवा फोटो अपलोड करण्यासाठी तुम्ही वापरत असलेल्या कोणत्याही साइटवर हा फोटो अपलोड करा)

३) तुमचा ब्लॉगची लिन्क आणि तुम्ही अपलोड केलेल्या फोटोची लिन्क एका नोटपॅडमध्ये पेस्ट करा:
यासाठी एक नोटपॅड उघडा. त्यात प्रथम तुमच्या ब्लॉगची लिंक पेस्ट करा. दुसर्‍या ओळीत तुम्ही अपलोड केलेल्या फोटोची लिन्क पेस्ट करा.
( यासाठी पिकासावेबमधे जाऊन तुम्ही ठरवलेला केलेला फोटो उघडा. त्यावर राइट क्लिक करा. आणि ‘View Image Info’ ह्या ऑप्शनवर क्लिक करा. मग एक नवीन विन्डो उघडेल आणि एक ओळ निळ्या कलरने हायलाइट झालेली दिसेल. ही तुम्हाला हवी असणारी लिंक आहे. त्या ओळीवर राइट क्लिक करून ”Copy” ह्या ऑप्शनवर क्लिक करा. आणि नोटपॅडमध्ये पेस्ट करा.)

४)आता तुमच्याकडे तुमच्या ब्लॉगची लिंक आणि तुम्ही निवडलेल्या फोटोची लिन्क नोटपॅडमध्ये रेडी आहे
उदा. ह्या दोन्ही लिंक्स साधारण अशा दिसतील.
माझ्या ब्लॉगचा अ‍ॅड्रेस/पत्ता/लिन्क: https://tivalyabavalya.wordpress.com/
मी सिलेक्ट केलेल्या फोटोची लिन्क: https://lh5.googleusercontent.com/-MSu9-f-lHJ8/UGS8gCOYt1I/AAAAAAAABkg/0aAB33Qk6OM/s128/11.jpg

४) विजेट कोड तयार करणे:
हुश्श. आता फक्त शेवटची पायरी 🙂 खाली दिलेला कोड नोटपॅडमध्ये कॉपी करा.

<a href=”AAA” target=”_blank”>
<img src=”BBB” width=”125″ height=”125″ />
</a>

त्यातल्या AAA च्या जागी तुमच्या ब्लॉगचा अ‍ॅड्रेस लिहा आणि BBB च्या जागी तुमच्या फोटोची लिन्क द्या.
तुमचा विजेट कोड तयार 🙂

५) अजून लक्षात आलं नसेल तर ही शेवटची स्टेप समजावून घ्या.
थोडक्यात आपण असं करणार आहोत.

<a href=”इथे तुमच्या ब्लॉग साइटचे नाव लिहिणे” target=”_blank”>
<img src=”इथे तुम्ही सिलेक्ट करून अपलोड केलेल्या इमेजची लिन्क देणे” width=”125″ height=”125″ />
</a>

तसाच तुमच्या ब्लॉगचा विजेट कोड बनवा. पुढच्या पोस्टमध्ये हा विजेट कोड आपल्या वर्डप्रेस ब्लॉगवर कसा लावायचा ते पाहू.

Advertisements

19 thoughts on “आपल्या ब्लॉगचा विजेट कोड (किंवा आयकॉन / लोगो / ब्लॉग बटण) कसे बनवायचे?”

 1. मी खूप दिवसापासून याच्या शोधत होते..आपल्यामुळे आज मलाही ते करता आले पण आता हा तयार केलेला विजेट कोड ब्लॉग वर कसा लावायचा याबद्दल थोडे मार्गदर्शन करावे….

  1. हॅलो Dipeeka,

   धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत 🙂
   तुझा ब्लॉग वर्डप्रेस वर आहे का कशावर.
   तुझ्या ब्लॉगचा पूर्ण पत्ता दे. मग सांगते.

   – टिवटिव

   1. मला देखील तयार केलेला विजेट कोड वर्डप्रेस ब्लॉग वर लोकांना क्लिक करता येईल असा कसा लावावा याच्या स्टेप्स हव्या आहेत. तुला माझा ब्लॉग माहिती आहेच.

   2. Hello Shreya,
    ‘लोकांना क्लिक करता येईल असा कसा लावावा’ म्हणजे कसा हवा आहे.क्लिक केल्यावर काय व्हायला हवे आहे. का कॉपी पेस्ट करता येइल असा हवा आहे? कळले नाही. ते सांग म्हणजे तुला नेमकं काय हवं आहे ते मला कळेल. धन्यवाद.

 2. खूपच छान पोस्ट…Thankas to Mahendra KulkarNi ( काय वाट्टेल ते ). त्यांनी ह्या पोस्ट ची लिंक दिली आणि माझे विजेट तयार झाले…अगदी २ मिनिटात…पण आता हे विजेट लावय्चे कसे?
  ही माहिती पण हवी आहे. आणि आभार आधिच देते….

  1. धन्यवाद सुरूचि आणि ब्लॉगवर स्वागत.
   ‘हा विजेट कोड आपल्या वर्डप्रेस ब्लॉगवर कसा लावायचा’ यासंबंधी लवकरच पोस्ट टाकेन.

   1. हाय सुरूचि,

    तुला विजेट कोड ब्लॉगवर कसा लावायचा ते हवे होते ना.
    आजच त्याबद्दल ‘आपण बनवलेला विजेट कोड आपल्या वर्डप्रेस ब्लॉगवर कसा लावायचा?’ ही पोस्ट टाकली आहे.

    Is it answering your question. Let me know.
    धन्यवाद.

    – टिवटिव

 3. chitra chikatla pan “img src” ani image che dimensions pan sobat distat ani click kela tar page not found asa yeta.. kay karava?


  <img src=”” width=”125″ height=”125″ />

  ha code ahe

  ata this is my widget code asa khali itaranchya blog war copy karnyasathi lihila asta, te yetach nahi..tithe chitrach yeta pratyek weli ..mhanje kay cpoy karaycha itaranni te text kasa lihaycha te pan sangta yeil ka?

  1. पोस्ट अपडेट केली आहे. परत एकदा नीट सगळ्या स्टेप्स फॉलो करून पहा.
   आणि तुझ्या विजेट कोडमध्येही थोडा प्रॉब्लेम आहे, असं वाटतं आहे. विजेट कोड इथे दिलास तर चेक करून सांगते, जर त्यात काही एरर असेल तर.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s