मी आणि माझा ब्लॉग :-)

माझ्याबद्दलः
‘काय बरं लिहाव?’ हा विचार करायला लागले मी माझ्याबद्दल लिहिताना. पण हे लिहिण्यात काय मजा ना. म्हणजे स्वत:च स्वत:ची महती ;-).. I mean.. माहिती काय सांगायची ना 🙂
तेव्हा आपली ओळख होईलच हळूहळू माझ्या पोस्ट्समधून, तुमच्या प्रतिसादांमधून आणि त्यातून तुमच्याशी साधलेल्या संवादातून.

आवडी-निवडी:
शिकण्याची आवड आहे. वाचनाची आवड आहे. पण फॅन्टसी किंवा सस्पेन्स पेक्षा अनुभव, आत्मचरित्र, खर्‍या घटना वगैरे वाचायला आवडतं. सस्पेन्स मूव्हिज पहायला आवडतात. छोटे-मोठे आर्ट आणि क्राफ्ट आइटम्स करायला आवडतं.
नवीन रेसिपी शिकायला, नवनवीन पदार्थ करून पहायला आवडतात. गप्पा मारायला, भटकायला, पोहायला आवडतं. माणसं जोडायला आवडतं. लहानपणी थोडंफार कथ्थक शिकले आहे. त्यामुळे नृत्याची आवड आहे. कधीतरी नाटकात काम करायचं आहे, पण अजून संधी नाही मिळाली.
सामाजिक संस्थांबद्दल वाचायला, माहिती करून घ्यायला आवडते. शक्य होईल तेव्हा सामाजिक संस्थांना मदत करायला आवडतं. ब्लॉग लिहायला पण आवडतं, पण नियमित लिहिला जात नाही.
आणि हो, एक राहिलचं. कोणता बिझनेस काढावा यावर स्वप्नरंजन करायला आवडतं 😉

ब्लॉगबद्दलः

ब्लॉग लिहायचा ब्लॉग लिहायचा खूप दिवस मनात होतं
रोजच्या व्यापातून वेळ काढणं काही केल्या जमत नव्हतं

सगळी कामं बाजूला सारून एक दिवस वेळ काढला
शुभारंभ करण्यासाठी अक्षयतृतीयेचा मूहूर्त साधला

जे जे काही मनातं आलं, ते ते टंकून ब्लॉगवर टाकलं
चार ओळींच का होईना, पण पहिलं पोस्ट तयार झालं

ब्लॉगवर काय काय लिहायचं बरं, ठरवली मग रूपरेषा
म्हंटल अनुभव लिहावेत आपले आपण, सोपी ठेवून भाषा

जसं रामदासांनी सांगितले आहे तसचं आपण करावे
आणि जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे.

Advertisements

5 thoughts on “मी आणि माझा ब्लॉग :-)”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s