तिसरा वाढदिवस

ब्लॉगिंगचं हे तिसरं वर्ष.

या तीन वर्षाच्या वाटचालीत सहभागी झालेल्या सर्वांचे खूप आभार. वेळ काढून पोस्ट्सना लाइक्स आणि कमेंट्समार्फत अभिप्राय देणार्‍या सर्वांना खूप खूप धन्यवाद. तुमच्या प्रतिसादामुळे खूप छान वाटतं, नवं काही लिहायचा उत्साह नक्कीच वाढतो, प्रोत्साहन मिळतं.

Thanks blog

या वर्षी कदाचित थोड्या कमी पोस्ट्स झाल्या असाव्यात. पण एक नक्की ठरवलं होतं की शक्यतो लिहिण्यात खंड पडू द्यायचा नाही, मग भले महिन्यातून एकच पोस्ट का होईना, पण लिहायची. यावर्षीच्या बर्‍याच पोस्ट्स पाककृतींच्या आहेत. घरी बनवल्या जाणार्‍या, रोजच्या जेवणातल्या सोप्या सोप्या पाककृती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला त्या आवडतील अशी आशा आहे.

हा मी बनवलेला Strawberry Layer Cake खास तुमच्यासाठी.

Strawberry Layered Cake

 

Advertisements

दुसरा वाढदिवस

नुकतीच ब्लॉगला दोन वर्ष पूर्ण झाली. पहिल्या वर्षात रांगणारं हे बाळ आता दुडू-दुडू चालू लागलं आहे 🙂
अगदी रोजच नाही पण जसं जमेल तसं पण नियमित पोस्ट टाकायचं ठरवल होतं. त्याप्रमाणे पोस्टस टाकायचा प्रयत्न केला. ब्लॉगिंगच्या या दुसर्‍या वर्षातही खूप मजा आली. नवे नवे विषय घ्यायचा प्रयत्न केला. पहिल्या वर्षाअखेर ११००+ हिट्स होत्या. दुसर्‍या वर्षाअखेर त्या १७,०००+ झाल्या. असा वाढता प्रतिसाद पाहून छान वाटलं.

ब्लॉगच्या दुसर्‍या वाढदिवसानिमित्त सर्व वाचक मित्र-मैत्रिणींचे आणि आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सुहृदांचे खूप खूप आभार. असाच लोभ राहू दे. ब्लॉगबद्दल/ब्लॉगपोस्टबद्दल काय आवडले, काय सुधारणा पाहिजेत वगैरे वगैरे नक्की कळवत रहा. धन्यवाद.

आणि हा दुसर्‍या वाढदिवसाचा केक खास तुमच्यासाठी 🙂

IMG_1133 - Copy

पहिला वाढदिवस …

सगळ्याच पहिल्या पहिल्या गोष्टी किती लक्षात रहातात. त्यांच नेहमीच एक वेगळं महत्त्व असतं. ब्लॉग वरच पहिलं पोस्ट लिहून आज बरोबर एक वर्ष झालं. आज ब्लॉगचा पहिला वाढदिवस. सही वाटतं आहे, ब्लॉग एक वर्षाचा झाला 🙂 चला आधी तोंड गोड करूया. ही मी केलेली एगलेस ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री खास तुमच्यासाठी 🙂

जरी ब्लॉग लिहायला वर्षभरापूर्वी सुरूवात केली असली तरी गेल्या ३-४ महिन्यातच ब्लॉगवर पोस्ट टाकायला थोडा जास्त वेळ मिळतो आहे. त्यामुळे एवढ्या अल्पावधीत ११००+ हिट्स ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. ब्लॉगजगतात may be ही खूप मोठी गोष्ट नसेलही. पण मला वैयक्तिक पातळीवर छान वाटलं. त्याबद्दल सर्व वाचकांचे मनापासून आभार. प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांचेही खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद.

माझ्या ब्लॉगवर मी लिहिलेल्या पाककृती कोणाच्या उपयोगी पडल्या, मी लिहिलेल्या अनुभवाचा कोणाला थोडाही फायदा झाला, माझ्या काही लेखांनी कोणाच्या चेहेर्‍यावर थोड जरी स्मित झळकलं असेल तर ब्लॉग काढल्याचं  मला सार्थक वाटेल.

परत एकदा वाचकांना अनेक धन्यवाद देऊन हे छोटसं पोस्ट इथेच संपवते.

माझं पहिलं पोस्टं : गणेश वंदन (आज मुहुर्त आहे अक्षयतृतीया)

                                    ||   श्री गणेशाय नमः ||

वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

हे माझं पहिलं पोस्ट 🙂 मस्त वाटतं आहे लिहिताना. गेल्या काही वर्षांपासून ब्लोगिंग सुरु झाल्याचं पहात होते. ऐकत होते. पण ब्लोग सुरु करण्याचा मुहूर्त काही आला नव्हता. वर्डप्रेसमुळे ब्लोग लिहिणं सोपं वाटलं. मग म्हटलं की चला try तर करून बघू. म्हणून आज हे छोटसं पोस्ट लिहित आहे. आज अक्षयतृतीया. सर्वांना अक्षयतृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.

आता भेटतच राहू अधून मधून Smile