आपण बनवलेला विजेट कोड आपल्या वर्डप्रेस ब्लॉगवर कसा लावायचा?

फास्ट ट्रॅक स्टेप्स,

१) तुमच्या ब्लॉगमध्ये लॉग-इन करा.

२) डॅशबोर्ड खालच्या लिस्ट मधून Appearance -> Widgets क्लिक करा.

३) उजव्या साइडला असणार्‍या विजेट एरिया ऑप्शन्समधून तुम्हाला विजेट कोड कोठे टाकायचा आहे तो ऑप्शन निवडून त्या विजेट एरियावर क्लिक करून तो विजेट एरिया ओपन करा. ‘Primary Widget Area’ बाय डिफॉल्ट एक्स्पान्डेड/ओपन असतो.

४) समजा आपल्याला Secondary Widget Area मध्ये विजेट कोड टाकायचा आहे. तर आता ‘Available Widgets’ मधून ‘Text’ विजेट वर क्लिक करून ते उचलून ‘Secondary Widget Area’ मध्ये टाका.

५) टाकल्या टाकल्या एक टेक्स्ट विंडो ओपन होईल. त्यात विजेट कोडला जे टायटल द्यायचे आहे ते ‘Title’ मध्ये टाका. त्याखालच्या टेक्स्ट एरिया मध्ये तुमचा विजेट कोड खालीलप्रमाणे लिहा, (फक्त खालच्या कोडमध्ये kode च्या ऐवजी code लिहा.)

[kode language="css" light="true" wraplines="true"]
तुमच्या ब्लॉगचा विजेट कोड
[/kode]

६) ‘Save’ बटणावर क्लिक करा. मग ‘Close’ लिंकवर क्लिक करा.

७) आता बाऊझरमध्ये नवीन विंडो ओपन करून तुमचा ब्लॉग ओपन करून त्यावर विजेट कोड आला आहे की नाही चेक करा.

———————————————————————————————————–

ज्यांना थोडी विस्ताराने माहिती हवी आहे त्यांच्यासाठी याच स्टेप्स अजून थोड्या सविस्तर देल्या आहेत.

सविस्तर स्टेप्स,

१) ब्लॉगमध्ये लॉग-इन केले की, डाव्या बाजूला डॅशबोर्ड नावाखाली असणार्‍या लिंक्स वाचत जावून, Appearance नावाच्या लिंकवर माऊस नेला की येणार्‍या मेनूतून Widgets वर क्लिक करा.

२)  ‘Available Widgets’ पेज लोड होईल. ते स्क्रोल डाउन करून ‘Text’ विजेट कुठे आहे ते पाहून घ्या. मग उजव्या बाजूला असणारे विजेट एरिया स्क्रोल अप आणि डाउन करून पाहून घ्या. तिथे हे विजेट एरिया दिसतील.
Primary Widget Area
Secondary Widget Area
First Footer Widget Area
Second Footer Widget Area
Third Footer Widget Area
Fourth Footer Widget Area

३) त्यापैकी ज्या विजेट एरियामध्ये तुमचा विजेट कोड तुम्हाला टाकायचा आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे तो विजेट एरिया एक्स्पांड/ओपन होईल. (प्रायमरी विजेट एरियामध्ये विजेट कोड टाकायचा असेल तर क्लिक करण्याची गरज नाही कारण तो बाय डिफॉल्ट एक्स्पान्डेड/ओपन असतो.)

४) समजा आपल्याला ‘Secondary Widget Area’ मध्ये आपला विजेट कोड टाकायचा आहे. तर  ‘Secondary Widget Area’ वर क्लिक करून तो ओपन करा. आता  ‘Available Widgets’ मधून ‘Text’ विजेट वर क्लिक करून ते उचलून माउस ने स्क्रोल अप करून ‘Secondary Widget Area’ मध्ये टाका.

५) टाकल्या टाकल्या एक टेक्स्ट विंडो ओपन होईल. त्यात ‘Title’ मध्ये तुम्हाला द्यावेसे वाटणारे विजेट कोड टायटल द्या. उदा. मी ‘टिवल्याबावल्या ब्लॉगचा विजेट कोड’ असे टायटल दिले आहे.

६) टायटलच्या खाली असणार्‍या टेक्स्ट एरियामध्ये तुमचा विजेट कोड खालीलप्रमाणे लिहा, (फक्त खालच्या कोडमध्ये kode च्या ऐवजी code लिहा.)

[kode language="css" light="true" wraplines="true"]
तुमच्या ब्लॉगचा विजेट कोड
[/kode]

उदा. माझा विजेट कोड असा आहे.

<a href="https://tivalyabavalya.wordpress.com/" target="_blank">
 <img src="https://lh5.googleusercontent.com/-MSu9-f-lHJ8/UGS8gCOYt1I/AAAAAAAABkg/0aAB33Qk6OM/s128/11.jpg" width="125" height="125" />
 </a>

तो विजेट कोड,  code टॅगमध्ये एन्क्लोज केल्यानंतर असा दिसेल.  (फक्त खालच्या कोडमध्ये kode च्या ऐवजी code लिहा.)

[kode language="css" light="true" wraplines="true"]
<a href="https://tivalyabavalya.wordpress.com/" target="_blank">
<img src="https://lh5.googleusercontent.com/-MSu9-f-lHJ8/UGS8gCOYt1I/AAAAAAAABkg/0aAB33Qk6OM/s128/11.jpg" width="125" height="125" />
</a>
[/kode]

७) ‘Save’ बटणावर क्लिक करा. मग ‘Close’ लिंकवर क्लिक करा.

८) आता बाऊझरमध्ये नवीन विंडो ओपन करून तुमच्या ब्लॉगचे नाव देऊन ब्लॉगचे फ्रंट पेज पहा. तिथे उजव्या साइडला स्क्रोल करून पाहिल्यास तुमचा विजेट कोड लोड झालेला दिसेल.

Advertisements