राले (Raleigh) पासून साधारण २० मिनिटे अंतरावर हिल रिज फार्म नावाचं एक छान फार्म आहे. वन डे किंवा हाफ डे ट्रीप साठी उत्तम. तिथे सगळ्या आऊट डोअर अॅक्टिविटीज असल्याने स्प्रिंग / समर / फॉल मध्ये गेल्यास उत्तम. पण जर समर मध्ये गेल्यास एखादा क्लाऊडी डे (ढगाळ वातावरण) पाहून जावं म्हणजे उन्हाचा त्रास होणार नाही.
फार्मच्या इथे गाडी पार्क करण्याची चांगली आणि फ्री सोय आहे. तिथूनच जवळ तिकिट खिडकी आहे. फार्मची तिकिटं काढायच्या ठिकाणीच फार्म अॅनिमल्स फूड आणि बदकं/मासे/कासवं या जलचर प्राण्यांचे खाद्य मिळते. फार्ममध्ये प्रवेश, तिथल्या राइड्स, अॅनिमल फूड, फिश फूड यासाठी वेगवेगळे चार्ज आहेत. तिकिटं काढल्यावर हाताला एक पिवळा बँड बांधून मग फार्ममध्ये प्रवेश मिळतो.

या फार्म मध्ये ट्रेन राइड, जायंट स्लाइड (खूप मोठी घसरगुंडी), कॉर्न प्लेहाऊस(वाळलेल्या मक्याच्या दाण्यांनी भरलेली एक छोटी खोली), जंपिंग पिलो (एक मोठे इनफ्लेटेबल टॉय) आणि फार्म अॅनिमल्स ना खाऊ घालणे ही बच्चेकंपनीसाठींची मेजर अॅट्रॅक्शन्स आहेत.
कॉर्न प्लेहाऊस

जायंट स्लाइड
जायंट स्लाइडवर स्लाइड करताना आणि थंडगार कॉर्न प्लेहाऊसमध्ये खेळायला, लोळायला धमाल मजा येते लहानांना आणि मोठ्यांनापण 🙂 कॉर्न प्लेहाऊसमध्ये काही सँड टॉइजही ठेवली आहेत, मक्याचे दाणे खेळायला. फार्ममध्ये कोंबड्या, शेळ्या, बदकं आहेत. त्यांना जाळीबाहेरून खाद्य टाकायची सोय केला आहे. आणि एका छोट्या तळ्यातल्या मासे, बदकं, कासव यांनाही खाद्य टाकायची सोय आहे.




जंपिंग पिलो
ट्रेन राइड

याशिवाय एक रंगीत मेझ, झोपाळे, घसरगुंड्या आणि इतर काही छोटी-मोठी रंगीबेरेंगी खेळणी ठेवली आहेत. इथे हे (hey) राइड, पोनी राइड पण उपलब्ध आहे. (पण आम्ही गेलो होतो तेव्हा पोनी राइड बंद होती आणि हे राइड आम्ही घेतली नाही.)




जुन्या काळची शेतीची अवजारे, जुन्या काळचे किचन पहाण्यासाठी ठेवले आहे. एके ठिकाणी एका लाकडी छताखाली भरपूर गवत (हे- hey) टाकून ठेवले आहे मुलांसाठी खेळायला.
इथे एक कव्हर्ड पिकनिक शेल्टर आहे. काही ठिकाणी टेबल आणि बाक ठेवले आहेत.



असं हे हिल रिज फार्म वन डे/हाफ डे ट्रीप करण्यासाठी हे एक चांगल ठिकाण आहे.
टीपा:
१) जाताना स्वतःबरोबर खाऊ, पाण्याच्या बाटल्या न्याव्यात. आम्ही गेलो तेव्हा तिथे खाण्यापिण्याच्या काही गोष्टी उपलब्ध नव्हत्या. त्यामूळे बरोबरचा खाऊ उपयोगी पडला.
२) पाणी/ज्यूस नक्की सोबत न्यावे. त्यामूळे डीहायड्रेशनचा त्रास नाही होणार.
३) रेस्टरूम्स चांगल्या आहेत.
४) या फार्मवर फॉलमध्ये स्पेशल कार्यक्रम असतात जसे भोपळा-तोडणी (pumpkin picking) वगैरे. तेव्हा फार्मच तिकिटंही थोडं जास्त असतं.
५) हिल रिज फार्मचा पत्ता
http://www.hillridgefarms.com/
703 Tarboro Road – Youngsville, NC 27596 – Directions
email: funonthefarm@hillridgefarms.com
(919) 556-1771 – 1-800-358-4170 – Fax: 919-556-5881
HOURS: (Mon-Fri 10-4) (Sat.-Sun. 10-5)