काही छान कोट्स

बरेचदा खूप छान छान कोट्स आपण ऐकत असतो. पण काही कोट्स आपल्याला एखाद्या अनुभवातून, परिस्थितीतून गेल्यावर जास्त कळतात आणि त्यामुळे त्या जास्त अपील होतात, भावतात.
अशाच काही छान कोट्स,

1) Never ever give up.

2) If you don’t ask, the answer is always no.
If you don’t step forward, you’re always in the same place.
― Nora Roberts

3) The Fear of Failure is Often Worse than Failure Itself.

4) Time heals all wounds.

5) Sometimes time is the best medicine.

6) When one door closes, another opens; but we often look so long and so regretfully upon the closed door that we do not see the one which has opened for us.
– Alexander Graham Bell

7) Always wrong persons teach the right lessons of life.

8) It takes a village to raise a child.

9) Entire water of the sea can’t sink a ship unless it gets inside the ship. Similarly, negativity of the world can’t put you down unless you allow it to get inside you.

 

Advertisements

काही चांगल्या वाचनीय साइट्स

१) बालभारती कविता
http://balbharatikavita.blogspot.com/

२) मराठी पुस्तक परिचय
http://pustakveda.blogspot.com/

३) आठवणीतली गाणी – मराठी गाणी आणि त्याचे लिरिक्स
http://www.aathavanitli-gani.com/Geet_Prakar

४) ‘चांदोबा’मराठी मासिकाचे अंक
http://www.chandamama.com/archive/MAR/storyArchive.htm

५) काही मराठी ई-बुक्स
http://ebooks.netbhet.com/

६) आपला लाडका चिंटू
http://www.chintoo.com/Marathi_Comics.aspx

पार्टी गेम्स

एखाद्या कार्यक्रमाला, गेट-टूगेदरला सगळे एकत्र जमले की खूप मजा येते. खाणे-पिणे, हॅ हॅ हू हू करणे, गप्पाटप्पा, पत्ते खेळणे अशा सगळ्या धमाल गोष्टी होतात. अशा वेळी काही पार्टी गेम्स ठेवले असतील तर मस्तच. छोटा ग्रुप असेल तर हे गेम्स खेळायला अजून मजा येते.
असेच काही मनोरंजक पार्टी गेम्स इथे देत आहे.

(१) १ मिनिट गेम्सः
या खेळांमध्ये एका मिनिटात एखादी गोष्ट करायची असते. जे कोणी ती गोष्ट दुसर्‍यापेक्षा जलद करेल ती व्यक्ति जिंकते असा साधा सोपा गेम.

१) स्ट्रॉ गेमः
यामध्ये प्रत्येकाला दोन पसरट बाऊल, एक स्ट्रॉ दिला जातो. एका बाऊलमध्ये मूठभर चवळीचे दाणे ठेवले जातात. स्ट्रॉमधून हवा ओढून चवळीचे दाणे स्ट्रॉ वापरून एका बाऊलमधून दुसर्‍या बाऊलमध्ये टाकणे.

२) छोटे फुगे फुगवणे:
एका मिनिटात जास्तीत जास्त फुगे फुगवणे आणि प्रत्येक फुगवलेल्या फुग्याला गाठ मारणे.

३) पत्त्याची घरं:
दोन पत्त्यांच एक घरं अशी, एका मिनिटात पत्त्यांची जास्तीत जास्त घरं बांधणे.

४) बादली/टब आणि बॉल्सः
एखाद्या कॉफी टेबलवर २ बादल्या  किंवा टब ठेवून, त्यापासून ५/१० फूट लांब उभं राहून एका मिनिटात जास्तीत जास्त बॉल्स बादली/टबमध्ये टाकणे.

५) मेमरी (स्मरणशक्ती) गेमः
एका टेबलवर एका टेबलक्लॉथवर अनेक वेगवेगळ्या वस्तू ठेवणे (जसं की कात्री, वही, पेन, चमचा, सॉफ्ट टॉय, टूथपेस्ट, लाटणं, रिमोट, वाटी, सेलोटेप, किल्ली, बॉल इ.इ.) आणि ३० सेकंदामध्ये त्या वस्तू लक्षात ठेवणे. नंतर टेबलक्लॉथ (आतल्या वस्तूंसह उचलून) दुसरीकडे ठेवणे. आता ३० सेकंद वेळ देऊन त्या वेळात ज्या आठवतील त्या जास्तीत जास्त वस्तूंची नावं लिहून काढणे.

६) चमचा आणि काचेच्या गोट्या/पेबल्स (किंवा सुपार्‍या किंवा गारगोट्या किंवा सागरगोट्या):
यामध्ये प्रत्येकाला दोन पसरट बाऊल, एक चमचा दिला जातो. एका बाऊलमध्ये बाऊल भरून पेबल्स ठेवले जातात. तोंडामध्ये चमचा धरून चमच्याला हात न लावता चमच्याने एका वेळी एक पेबल उचलून एका बाऊलमधून दुसर्‍या बाऊलमध्ये टाकणे.

७) सुई-दोरा:
एका मिनिटामध्ये सुईमध्ये दोरा ओवून त्यात जास्तीत जास्त पॉपकॉर्न / चुरमुरे / फुलं / बटणं ओवणे.

८) शेंगा सोलणे:
एका मिनिटात जास्तीत जास्त शेंगा सोलून जास्तीत जास्त दाणे बाऊलमध्ये जमा करणे.

(२) प्राण्याला शेपटी काढणे:
एका मोठ्या पेपरवर / कार्डबोर्डवर / फळ्यावर एखाद्या प्राण्याचे (हत्ती / झेब्रा / उंट) चित्र काढणे आणि गेममध्ये भाग घेणार्‍यांचे डोळे बांधून प्रत्येकाला वन बाय वन त्या चित्राजवळ जाऊन स्केचपेनने/ खडूने चित्रातील प्राण्याला शेपटी काढायला सांगणे. जी व्यक्ति हे काम नीट करेल ती जिंकली.

(३) सिनेमाचे/मूव्हीचे नाव ओळखणे:
दोन ग्रुप बनवणे, ग्रुप ए आणि बी. त्यापैकी ग्रुप ए मधल्या एका व्यक्तिला ग्रुप बी ने बोलवायचे आणि एका पिक्चरचे(मूव्हीचे) नाव सांगायचे. ग्रुप ए मधल्या त्या व्यक्तिने ग्रुप ए ला त्या पिक्चरचे नाव (एक अक्षरही न बोलता फक्त) अभिनय करून सांगायचा प्रयत्न करायचा. ग्रुप ए ने तो सिनेमा बरोबर ओळखला तर ग्रुप ए ला १ पॉईंट. नंतर ग्रुप बी मधल्या एका व्यक्तिला ग्रुप ए ने बोलवायचे आणि वर सांगितला तसाच गेम चालू ठेवायचा

(४) गाण्यांच्या भेंड्या:
गाण्याचे शेवटचे अक्षर पकडून किंवा गाण्यातला शब्द पकडून गाण्याच्या भेंड्या खेळणे.

गणेश गुणाकार (वैदिक गणितातील दोन संख्यांचा गुणाकार करायची एक सोपी पद्धत)

लहानपणी, शाळेत असताना एक शिक्षक आम्हाला वैदिक गणित शिकवायचे. त्यात गणित सोडवायच्या सोप्या सोप्या पद्धती दिल्या असायच्या. इंटरेस्टिंग होतं वैदिक गणित.

तर मला त्यातली दोन संख्यांचा गुणाकार करण्याची एक पद्धत आवडायची. त्याचं नाव आहे ‘गणेश गुणाकार’. दोन कितीही आकडी संख्यांचा गुणाकार या खूप सोप्या पद्धतीने खूप जलद करता येतो. तर पाहूया कसा करायचा हा गणेश गुणाकार.

मला आवडलेली पुस्तकं

मी वाचलेली आणि मला आवडलेली पुस्तकं इथे देत आहेत.
वेळ मिळाला की (किंवा वेळ काढून ;-)) नक्की वाचा.

१) प्रकाशवाटा
लेखक – डॉ. प्रकाश आमटे
प्रकाशक – समकालीन प्रकाशन, पुणे
पृष्ठसंख्या – १५६
किंमत – रुपये दोनशे
पुस्तक-परिचय इथे वाचता येईल – http://www.maayboli.com/node/8023

२)पुण्यभूमी भारत
लेखिका – सुधा मूर्ती
अनुवाद – लीना सोहोनी
प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठसंख्या – १७६
किंमत – रु. १३०/-
पुस्तक-परिचय इथे वाचता येईल – http://www.mymarathi.com/index.php?option=com_content&task=view&id=851&Itemid=52

३) सुखद बालसंगोपन
लेखिका – डॉ. रत्नावली दातार
प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठसंख्या – ८८
किंमत – रु. ७०/-
पुस्तकाबद्दल इथे काही माहिती मिळेल – http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=5503417822610546476&PreviewType=books

छोटसं पण खूपच सुंदर पुस्तक आहे हे. विशेषत: बाळ जन्मल्यावर नव्याने आई होणार्‍या प्रत्येकीला उपयोगी पडेल असं आहे. म्हणजे बाळाच्या लहान सहान गोष्टी, बाळांविषयी पडणारे प्रश्न (FAQ), लहानग्यांची घ्यायची काळजी, छोटे-मोठे आजार, आईसाठी महत्वाच्या गोष्टी इ.इ. गोष्टी छान लिहिल्या आहेत. त्यामुळे बाळ जन्मण्याआधीच वाचून काढलं तर चांगला उपयोग होईल असं छान पुस्तक आहे.

४) अंधश्रद्धा विनाशाय
लेखक – डॉ. नरेंद्र दाभोलकर
प्रकाशक – राजहंस प्रकाशन
पृष्ठसंख्या – २०६
किंमत – रु. १७५/-
पुस्तकाबद्दल इथे काही माहिती मिळेल – http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=5499009863813071096&PreviewType=books

५) कोल्हाट्याचं पोर
लेखक – डॉ. किशोर शांताबाई काळे
प्रकाशक –  ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठसंख्या – ११६
किंमत – रु. १००/-
पुस्तक-परिचय इथे वाचता येईल – http://www.pustakvishwa.com/content/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0
पुस्तकाबद्दल इथे काही माहिती मिळेल – http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=010912070229&PreviewType=ebooks

नसतेस घरी तू जेव्हा… (विनोदी)

नसतेस घरी तू जेव्हा…     ( विनोदी विडंबन )
कवी – केशवसुमार

नसतेस घरी तू जेव्हा
जीव हलका हलका होतो
पीण्याला जमती सारे
अन्‌ एकच गलका होतो

नभ फाटून वीज पडावी
जल्लोश तसा मी करतो
ही शुद्ध जरा क्षीण होते
अन्‌ पती बोलका होतो

येताच विड्या ओठांशी
मी दचकून बघतो मागे
खिडकीशी थांबून ओढा
मग गंध तयांचा जातो

तव घरात अवतरण्याच्या
मज स्मरती घातकवेळा
घर भरभर अवरून सगळे
मी पुन्हा सात्त्विक होतो

तू सांग सख्या मज काय
तू केले मी नसताना ?
माझा मग जीव उगाच
भात्यासम धडधड करतो

ना अजून झालो चालू
ना हुशार अजुनी झालो
तुज पाहून मी डगमगतो
अन् चरणा वर तव पडतो !

——————————————————————————————————

टीप – कवीच्या पूर्वपरवानगीने ही कविता या ब्लॉगवर पोस्ट केली आहे.

वाचावी अशी वाटणारी पुस्तकं

काही वेळा ब्लॉग्जवरून, काही वेळा साईट्सवरून, काही वेळा मित्रमैत्रिणींकडून काही पुस्तकांचा परिचय वाचायला/ऐकायला मिळतो. आणि मग वाटतं की ही पुस्तकं मिळवून वाचायलाच हवीत. अशाच काही पुस्तकांची यादी इथे देत आहे, जी मिळवून मला वाचायची आहेत…

१) सात पाउले आकाशी
लेखिका: कुंदनिका कापडीआ
अनुवादिका: उषा पुरोहित
प्रकाशक: साहित्य अकादमी, नवी दिल्ली
किंमत: रुपये १८०/-
मला पुस्तक परिचय इथे वाचायला मिळाला:
http://abdashabda.blogspot.com/2012/03/blog-post_18.html

२) केतकरवहिनी
लेखिका: उमा कुलकर्णी
मला पुस्तक परिचय इथे वाचायला मिळाला:
http://restiscrime.blogspot.com/2012/04/blog-post_12.html

३) गार्गी अजून जिवंत आहे
लेखिका: मंगला आठलेकर
प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे
दुसर्‍या आवृत्तीतील पृष्ठे: ११६
दुसर्‍या आवृत्तीची किंमतः रु. ७०/-
मला पुस्तक परिचय इथे वाचायला मिळाला:
http://www.misalpav.com/node/9886

४) नॉट विदाऊट माय डॉटर
लेखिका: बेट्टी महमूदी
अनुवादिका: लीना सोहोनी
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
दुसर्‍या आवृत्तीतील पृष्ठे: ३१२
दुसर्‍या आवृत्तीची किंमतः रु. २४०/-
पुस्तक परिचय इथे वाचायला मिळेल:
http://www.mehtapublishinghouse.com/BookDetail.aspx?BookCode=266

५)  तोत्तोचान (Tottochan)
लेखिका: कुरोयानागी तेत्सुको
अनुवादिका: चेतना सरदेशमुख गोसावी
प्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट
या आवृत्तीतील पृष्ठे: १५०
किंमतः रु. ५०/-
पुस्तक परिचय इथे वाचायला मिळेल:
http://www.misalpav.com/node/13334

जशी जशी अजून न वाचलेली आणि काळजाला भिडतील अशी वाटणारी पुस्तकं माहिती होत जातील तस तशी ही यादी अपडेट करत राहिन. आणि जेव्हा ही पुस्तकं वाचण्याचा योग येईल त्यानंतर त्याचा अभिप्राय किंवा पुस्तक परिचय लिहिण्याचा मानस आहे. बघू कसे आणि कधी जमते ते.