दिवाळीचे लायटिंग

दिवाळी अगदी तोंडावर आली होती. आणि दिवाळीची बरीच तयारी करून झाली होती. फराळाचे पदार्थ करून झाले होते. रांगोळ्या, पणत्या, मेणबत्त्या आणून झाल्या होत्या. आणि गेल्या वर्षीचा आकाशकंदिल ही सापडला होता.
मग लक्षात आले की अरे लायटिंगसाठी थोडी जास्त लांब वायर लागणार आहे. मग ती वायर आणण्यासाठी अस्मादिकांचे एका हार्डवेअरच्या दुकानात जाणे झाले. एक तर जनरली हार्डवेअरच्या दुकानात सहसा मुली कमी जात असल्याने कदाचित, आधीच दुकानदाराच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह होते. मग त्याला कोणती वायर हवी, किती लांबीची वगैरे सांगितले. त्याने मला तशी एक वायर काढून दिली.
आता यानंतर मी ती वायर घ्यावी, पैसे द्यावे आणि कल्टी व्हावे अशी त्याची अपेक्षा. पण त्याच वेळी मला दुकानातली त्या वायरच्या टाइपमधली इतर रंगीत भेंडोळी दिसली आणि मी त्याला नेहमीच्या शॉपिंगच्या सवयीने विचारले,”यात काही आणखी काही कलर कॉम्बिनेशन मिळेल का.” 🙂 यावर त्याला काय बोलावे कळेना.
त्याच्या दुकानदारी आयुष्यात त्याला असा प्रश्न पहिल्यांदाच कोणीतरी विचारला असेल. त्याच्या चेहर्‍यावरील असे अगतिक 😉 भाव पाहून मग मात्र मी त्याला पैसे देउन घरी आले 😀

Advertisements

सेक्युरीटी चेक

आयुष्यात अनेक गमती जमती घडत असतात. असाच एक मजेशीर प्रसंग.

      २/३ वर्षापूर्वीची गोष्ट. वेळ आहे सकाळी ८ वाजताची. स्थळ आहे एका नामांकित आय. टी. कंपनीचे प्रवेशद्वार. बसमधून खाली उतरून सेक्युरिटीसमोरील  मुलींच्या रांगेत मी उभी होते. रोज सेक्युरीटीकडून बॅग चेक केली जाते, तशी आजही केली जात होती. आणि लाइन भरभर पुढे सरकत होती.
      माझा नंबर आला. नेहमीप्रमाणे मी माझी खांद्याला अडकवलेली पर्स उघडली. आणि लेडी सेक्युरिटी गार्ड  समोर धरली. तिने मग माझ्याकडे (आश्चर्याने?/संशयाने?) पाहिले आणि ती मला म्हणाली, “तुम्ही शेवया विकता का?” 😉  :-O मला क्षणभरं खूप राग आला आणि नंतर खूप हसू आलं.                                                                                                                                                                     त्याचं झालं असं होतं की माझ्या घराजवळ एके ठिकाणी हाताने बनवलेल्या शेवया छान मिळतात. त्याच एक लहान पॅक मी माझ्या एका संसारी मैत्रिणीसाठी आणलं होतं आणि ते नेमकं ट्रान्स्पारंट कव्हरमध्ये होतं.
That was one of the embarrassing moments of my life 🙂

माझं पहिलं पोस्टं : गणेश वंदन (आज मुहुर्त आहे अक्षयतृतीया)

                                    ||   श्री गणेशाय नमः ||

वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

हे माझं पहिलं पोस्ट 🙂 मस्त वाटतं आहे लिहिताना. गेल्या काही वर्षांपासून ब्लोगिंग सुरु झाल्याचं पहात होते. ऐकत होते. पण ब्लोग सुरु करण्याचा मुहूर्त काही आला नव्हता. वर्डप्रेसमुळे ब्लोग लिहिणं सोपं वाटलं. मग म्हटलं की चला try तर करून बघू. म्हणून आज हे छोटसं पोस्ट लिहित आहे. आज अक्षयतृतीया. सर्वांना अक्षयतृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.

आता भेटतच राहू अधून मधून Smile