पेन स्टँड (Simple Arts and Crafts)

वॉलमार्टमध्ये मिठाचे जे छोटे गोल कंटेनर मिळतात ते पाहून त्यापासून पेन स्टँड करायची कल्पना डोक्यात आली. म्हणून पेन स्टँड करून पाहिला. सुबक झाला. शिवाय एका सॉल्ट कंटेनरचे रिसायकलिंग झाले, टाकाऊतून टिकाऊ. करायला सोपा आणि पेन/पेन्सिल/कात्री ठेवायला उपयोगी अशा पेन स्टँडची ही कृती. नक्की करून पहा 🙂

साहित्यः एक रिकामा मिठाचा गोल डबा, एक फॅन्सी पेपर (gift wrapping paper), कात्री, एक (नटराज) पेपर कटर, डिंक/ग्लू/फेविकॉल

कृती:
१) पहिल्यांदा सॉल्ट कंटेनरचा वरचा गोलाकार भाग (टॉप) पहा. त्यावर पेनाने/मार्करने कडेपासून बोटभर जागा सोडून एक सर्कल काढा. ह्या सर्कलवर पेपर कटर फिरवून गोलाकार कापून घ्यावा.

२) आता कंटेनर कव्हर करण्यासाठी लागेल एवढा फॅन्सी पेपर कात्रीने कापून घ्यावा. कंटेनरच्या उंचीच्या दोन बोटं वर येईल इतक्या रूंदीचा आणि कंटेनर पूर्णपणे कव्हर होईल इतक्या लांबीचा पेपर कट करावा.

३) कंटेनरच्या बाहेरील बाजूस सगळीकडे ग्लू लावून घ्या. आता त्याला फॅन्सी पेपर गुंडाळून घ्या. कंटेनर व्रॅप केल्यावर त्याच्या उंचीपेक्षा थोडा जास्त कागद घेतल्याने जो ज्यादा कागद राहिला आहे तो सर्व बाजूंनी कंटेनरच्या आतल्या साइडला फोल्ड करून घ्या.

टीपः
हा मिठाचा डबा, पेन स्टँड जितक्या उंचीचा हवा आहे तितक्या उंचीवर कट करून हवा तसा पेन स्टँड बनवता येईल.

IMG_3794

IMG_3796

Advertisements