प्रतिज्ञा

पूर्वी लहानपणी, शाळेत असताना, शाळा सुरू होण्याच्या सुमारास, साधारण ११ च्या सुमारास शाळेची घंटा वाजत असे. मग सर्व वर्गातली मुले-मुली शाळेच्या पटांगणात एकत्र जमत असू. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपापल्या उंचीनुसार रांगेत उभं रहायचं असे. या जागा शिक्षकांनी ठरवून दिलेल्या असतं. आपल्या पुढच्या विद्यार्थ्याच्या / विद्यार्थिनीच्या मागे एक हात अंतर ठेवून आपण थांबायचे असे. मग आधी प्रार्थना आणि मग प्रतिज्ञा म्हणणे हे कार्यक्रम पार पडत असतं. त्यानंतर सगळे जण ओळीने आपापल्या वर्गात जातं असतं आणि शाळेचा पहिला तास सुरू होत असे. वर्षानुवर्षे रोज म्हंटली जाणारी ही प्रतिज्ञा अजूनही बरीचशी नीट आठवते. हीच प्रतिज्ञा इथे देत आहे.

प्रतिज्ञा –

” भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे. “

Advertisements