आपल्या ब्लॉगचा विजेट कोड (किंवा आयकॉन / लोगो / ब्लॉग बटण) कसे बनवायचे?

स्वतःच्या वर्डप्रेस ब्लॉगचे आयकॉन (Icon) कसे बनवायचे? स्वतःच्या ब्लॉगचा विजेट कोड कसा बनवायचा? ब्लॉग बटण कसे बनवायचे? लोगो कसा बनवायचा?

या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे. आणि उत्तर सोपे आहे. अगदी सोप्प आहे.
मला स्वतःला हे आयकन बनवायचे होते. खरं तर साधी गोष्ट आहे पण इतका वेळ लागला R & D करून स्वत:चे विजेट बनवायला की बस्स. R & D करायला २ तास आणि विजेट करायला २ मिनिटे.
चला तर जाणून घेऊ की हे करायचं कसं?(१) ज्यांना थोडीफार माहिती आहे त्यांच्यासाठी सोप्या स्टेप्सः

१) तुमच्या कॉम्प्युटर/लॅपटऑप मधला कोणताही फोटो निवडा. तो ‘१२५ बाय १२५’ पिक्सेल इतक्या लहान आकारात दिसणार आहे, त्यानुसार फोटो निवडा.
२) हा फोटो पिकासा वेबवर अपलोड करा. आणि फोटोवर राइटक्लिक करून ”View Image Info” क्लिक करून” निळी हायलाइटेड लाइन कॉपी करा. ही आहे तुम्ही अपलोड केलेल्या फोटोची लिन्क.
३) तुमचा ब्लॉगची लिन्क आणि तुम्ही अपलोड केलेल्या फोटोची लिन्क एका नोटपॅडमध्ये पेस्ट करा.
४) आता शेवटची पायरी. खाली दिलेला कोड नोटपॅडमध्ये कॉपी करा.
<a href=”AAA” target=”_blank”>
<img src=”BBB” width=”125″ height=”125″ />
</a>
त्यातल्या AAA च्या जागी तुमच्या ब्लॉगचा अ‍ॅड्रेस लिहा आणि BBB च्या जागी तुमच्या फोटोची लिन्क द्या.
तुमचा विजेट कोड तयार 🙂

(पुढच्या पोस्टमध्ये हा विजेट कोड आपल्या वर्डप्रेस ब्लॉगवर कसा लावायचा ते पाहू.)

(२) Beginners साठी (नवशिक्यांसाठी) सविस्तर स्टेप्सः

१) फोटो सेलेक्ट करणे:
तुम्हाला आवडणारा तुमच्या कॉम्प्युटरमधला / लॅपटॉपमधला कोणताही एक फोटो सिलेक्ट करा (ठरवा).  हा फोटो सिलेक्ट करताना हे लक्षात असू द्या की हा फोटो १२५ पिक्सेल बाय १२५ पिक्सेल इतक्या छोट्या आकारात दिसणार आहे. त्या दृष्टीने फोटो choose करा / सिलेक्ट करा.
उदा. इतका लहान दिसणार आहे हा फोटो.

२) फोटो अपलोड करणे:
हा फोटो पिकासा वेबवर अपलोड करा. (किंवा फोटो अपलोड करण्यासाठी तुम्ही वापरत असलेल्या कोणत्याही साइटवर हा फोटो अपलोड करा)

३) तुमचा ब्लॉगची लिन्क आणि तुम्ही अपलोड केलेल्या फोटोची लिन्क एका नोटपॅडमध्ये पेस्ट करा:
यासाठी एक नोटपॅड उघडा. त्यात प्रथम तुमच्या ब्लॉगची लिंक पेस्ट करा. दुसर्‍या ओळीत तुम्ही अपलोड केलेल्या फोटोची लिन्क पेस्ट करा.
( यासाठी पिकासावेबमधे जाऊन तुम्ही ठरवलेला केलेला फोटो उघडा. त्यावर राइट क्लिक करा. आणि ‘View Image Info’ ह्या ऑप्शनवर क्लिक करा. मग एक नवीन विन्डो उघडेल आणि एक ओळ निळ्या कलरने हायलाइट झालेली दिसेल. ही तुम्हाला हवी असणारी लिंक आहे. त्या ओळीवर राइट क्लिक करून ”Copy” ह्या ऑप्शनवर क्लिक करा. आणि नोटपॅडमध्ये पेस्ट करा.)

४)आता तुमच्याकडे तुमच्या ब्लॉगची लिंक आणि तुम्ही निवडलेल्या फोटोची लिन्क नोटपॅडमध्ये रेडी आहे
उदा. ह्या दोन्ही लिंक्स साधारण अशा दिसतील.
माझ्या ब्लॉगचा अ‍ॅड्रेस/पत्ता/लिन्क: https://tivalyabavalya.wordpress.com/
मी सिलेक्ट केलेल्या फोटोची लिन्क: https://lh5.googleusercontent.com/-MSu9-f-lHJ8/UGS8gCOYt1I/AAAAAAAABkg/0aAB33Qk6OM/s128/11.jpg

४) विजेट कोड तयार करणे:
हुश्श. आता फक्त शेवटची पायरी 🙂 खाली दिलेला कोड नोटपॅडमध्ये कॉपी करा.

<a href=”AAA” target=”_blank”>
<img src=”BBB” width=”125″ height=”125″ />
</a>

त्यातल्या AAA च्या जागी तुमच्या ब्लॉगचा अ‍ॅड्रेस लिहा आणि BBB च्या जागी तुमच्या फोटोची लिन्क द्या.
तुमचा विजेट कोड तयार 🙂

५) अजून लक्षात आलं नसेल तर ही शेवटची स्टेप समजावून घ्या.
थोडक्यात आपण असं करणार आहोत.

<a href=”इथे तुमच्या ब्लॉग साइटचे नाव लिहिणे” target=”_blank”>
<img src=”इथे तुम्ही सिलेक्ट करून अपलोड केलेल्या इमेजची लिन्क देणे” width=”125″ height=”125″ />
</a>

तसाच तुमच्या ब्लॉगचा विजेट कोड बनवा. पुढच्या पोस्टमध्ये हा विजेट कोड आपल्या वर्डप्रेस ब्लॉगवर कसा लावायचा ते पाहू.

Advertisements